Akola News: PM Crop Insurance Scheme; Proposals have to be submitted by December 15 
अकोला

प्रधानमंत्री पीक विमा योजना; १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव करावा लागेल सादर

सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा  :  प्रधानमंत्री पीक विमा योजना रबी हंगाम वर्ष २०२०-२१ मध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह आपले प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे. कर्जदार शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक नसल्यास त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज बँकेस सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.


प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून, कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

या योजने अंतर्गत विमा हप्ता दर ३० टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकर्‍यांवरील विमा हत्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगाम सन २०२०-२१ ते २०२०-२३ या तीन वर्षाकरिता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
विमा क्षेत्र घटक ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार असून, पीक विमा निहाय अधिसुचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ किंवा गट आणि तालुका किंवा तालुका गट राहणार आहे.

या योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचुक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरीता उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे, तसेच पिकांच्या मिळणारे उत्पन्नाचे अंदाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे.


या वर्षीच्या रब्बी हंगाम सन २०२०-२१ मध्ये पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, यांनी केलेले आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I: वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येणार? तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारताच्या Playing XI मध्ये चक्रावरणारे प्रयोग दिसणार...

एआयमुळे भारतातील नव्या नोकऱ्यांचे बदलणार स्वरूप; तरुणांच्या प्रशिक्षणावर होणार परिणाम

Chakan Onion Market: कांद्यानं हसवलं, दुष्काळानं रडवलं! चाकण बाजारात भाव वाढले; उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Live News : अमित शहा २ नोव्हेंबर रोजी तेलंगणा भाजपच्या 'पदयात्रेत सहभागी होणार

Sachin Tendulkar Ganpatipule Visit : क्रिकेटचा देव बाप्पापुढे नतमस्तक! सचिन तेंडुलकर यांनी घेतले गणपतीपुळेतील प्रसिद्ध स्वयंभू गणपतीचे दर्शन, लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT